महाराष्ट्र

Bacchu Kadu : शेतकऱ्यांना गिळणाऱ्या ‘नागनाथी’ सरकारच्या भ्रष्टाचाराचे पाळंमुळं उपटू

Farmer Rights : सहा लाख स्त्रियांची वेदना घेऊन रामटेक ते नागपूर सिंदूर यात्रा

Post View : 45

Author

शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी सरकारविरोधात भगतसिंगगिरीची हाक देत बच्चू कडूंनी आंदोलन छेडले आहे.

राज्यभर गाजत असलेला शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा केवळ राजकीय चर्चेचा विषय राहिलेला नाही, तर लाखो कुटुंबांच्या जीवनमरणाचा प्रश्न बनला आहे. मागील तीन अधिवेशनं पार पडूनही शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीबाबत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने, प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू आक्रमक पवित्रा घेऊन पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले आहेत. अमरावतीच्या परतवाडा येथून सुरू झालेलं चक्काजाम आंदोलन हे केवळ वाहतुकीचं अडथळा नव्हतं, तर शासनाच्या खोट्या आश्वासनांविरुद्धचा थेट बंडाचा नारा होता. ‘सातबारा कोरा करा’ या प्रमुख मागणीसाठी कडू यांचं हे नवीन आंदोलन आता एक वेगळाच वळण घेत आहे.

शेतकरी विधवांच्या न्यायासाठी ‘सिंदूर यात्रा’. बच्चू कडूंनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे आतापर्यंत सुमारे सहा लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांच्या मागे राहिलेल्या माय-भगिनींच्या कपाळावरील सिंदूर आजही सरकार विसरलेलं आहे. तो सिंदूर आम्ही विसरलो नाही, असं सांगत त्यांनी रामटेक ते नागपूर दीक्षाभूमी दरम्यान सिंदूर यात्रा काढण्याची घोषणा केली आहे. हे आंदोलन फक्त विदर्भापुरतं मर्यादित न राहता, दुसरी अशीच यात्रा हिंगोली ते नांदेड दरम्यान मराठवाड्यातही काढण्यात येणार आहे. सरकारला सद्बुद्धी यावी यासाठी गावागावांत फिरता गणपती बसवून प्रार्थना केली जाणार असल्याचंही त्यांनी जाहीर केले.

Anil Deshmukh : राज्यात जन सुरक्षेच्या नावाखाली दडपशाही सुरू

सरकारचं काळं मन

यवतमाळ जिल्ह्यातील गहुली गावात माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित शेतकरी आत्मचिंतन बैठकीत बच्चू कडूंनी आंदोलनाच्या पुढील टप्प्याचा इशारा दिला. येत्या २ ऑक्टोबरनंतर आम्ही गांधीगिरी सोडणार आहोत. आता भगतसिंगगिरी सुरू होईल. गावागावांतून ट्रॅक्टर मोर्चे निघतील. ही शेतकऱ्यांची क्रांती असेल, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती का दिली जात नाही, यावर सार्वजनिक उत्तर द्यावं. अन्यथा आंदोलन अधिक तीव्र आणि सरकारसाठी धोकादायक होईल, असा इशाराही त्यांनी दिला.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावरही बच्चू कडूंनी जोरदार टीका केली. बावनकुळे आमच्या आंदोलनाला स्टंटबाजी म्हणतात. पण इथे शेतकरी पाय झिजवून मरतोय. कोकाटे विधिमंडळात रमी खेळतात त्यांना शेतकऱ्यांचं दुःख काय समजणार? प्रशासन काम करत नाही, पंचनामे होत नाहीत, आदेश निघत नाहीत. सरकार केवळ खोट्या घोषणा करतंय, असा आरोप करताना त्यांनी म्हटलं, शेतकरी रक्तदान करताहेत, पण सरकारचं मन अजूनही काळं आहे. श्रीकृष्णाने कालिया नागाला ठेचलं. आम्ही शेतकऱ्यांना गिळणाऱ्या या फसव्या धोरणांना ठेचू, अशा शब्दांत त्यांनी आगामी संघर्षाची तयारी स्पष्ट केली.

Devendra Fadnavis : राजकीय तमाशा संपवण्यासाठी मुख्यमंत्री झाले आक्रमक

शेवटी बच्चू कडूंनी सांगितले की, सहा लाख हिंदू मातांनी आपला सिंदूर गमावला, तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक शब्दही बोलले नाहीत. श्रद्धांजली तरी द्यावी, एवढंही त्यांच्या मनात नाही. सिंदूर यात्रा केवळ भावनांचं प्रतीक नसून, ही संघर्षाची नवी लाट ठरणार आहे. शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांसाठी न्याय मिळवण्याच्या निर्णायक लढ्याची सुरुवात.

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर यांनी नागपुरातील धनवटे नॅशनल कॉलेजमधून पत्रकारिता व जनसंज्ञापन विषयात पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. 2023-24 मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी द लोकहित लाइव्ह येथे आपल्या करीअरला सुरुवात केली.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!