महाराष्ट्र

Parinay Fuke : गांधींच्या खोट्या आरोपांवर डॉ. फुकेंचा रिॲलिटी बॉम्ब

BJP : मंचावरची बडबड थांबवा आणि खरे पुरावे दाखवा

Post View : 18

Author

भंडारा-गोंदियातील भाजपचा किल्ला बळकट करणारे डॉ. परिणय फुके यांनी राहुल गांधींवर थेट शब्दबाण झाडत त्यांच्या ‘1 कोटी बोगस मतदार’ दाव्याची हवा काढून टाकली. राज्य निवडणूक आयोगाच्या पत्राचा दाखला देत फुके यांनी काँग्रेसच्या कथित पुराव्याला थेट आव्हान दिले.

भंडारा-गोंदिया जिल्ह्यात भाजपची पकड घट्ट करणारे, स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाणारे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी यावेळी थेट राहुल गांधींच्या ‘बोगस मतदार’ या गाजलेल्या आरोपाची हवा काढून टाकली आहे. मंचावरून आणि माईकसमोरून मोठमोठे दावे करणाऱ्यांना आता पुराव्याची कसोटी लागली आहे. त्यासाठीच फुके यांनी अशी ‘बात’ सांगितली की, काँग्रेसच्या दाव्याचा फुगा फुटलाच नाही, तर तुकडे-तुकडे झाला.

डॉ. परिणय फुके यांनी म्हटले की, राहुल गांधींनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत तब्बल 1 कोटी बोगस मतदार असल्याचा बिनबुडाचा आरोप पत्रकार परिषदेत केला होता. पण आता त्यांच्या या आरोपांवर राज्य निवडणूक आयोगाने थेट प्रत्युत्तर देत ‘सणसणीत चपराक’ लगावली आहे. आयोगाने राहुल गांधींना अधिकृत पत्र पाठवून सांगितले की, काँग्रेसच्या प्रतिनिधींना दोन वेळा नव्या मतदार याद्या देण्यात आल्या होत्या. त्यामुळे ‘हवेतील गोळ्या’ झाडण्याऐवजी, त्या बोगस मतदारांची नावं, तपशील आणि पक्के पुरावे शपथपत्रासह द्यावेत.

Ashish Jaiswal : जंगल टू ग्लोरी; जयस्वालांचा आदिवासी एम्पॉवरमेंट मिशन

शब्दांची जबाबदारी घ्यावी

एक महत्वाचा मुद्दा म्हणजे राहुल गांधी स्वतः त्या मतदारसंघाचे मतदार आहेत का नाहीत, हेही स्पष्ट लिहावे, असा आयोगाचा आदेश. शिवाय आयोगाने स्पष्ट इशारा दिला आहे की, खोटं शपथपत्र देणं हा निवडणूक नियमावलीच्या कलम 31 नुसार गुन्हा आहे. खोटे पुरावे देणं हा भारतीय न्यायसंहितेच्या कलम 227 नुसार दंडनीय अपराध आहे. डॉ. फुके यांनी टोकदार शब्दांत हल्ला चढवत म्हटले, मंचावर उभं राहून बडबड आणि हवेत आरोप करण्याचा काळ संपला आहे. आता राहुल गांधींना आपल्या शब्दांची जबाबदारी घ्यावी लागेल. ठोस पुरावे सादर करण्याशिवाय पर्याय नाही. यामुळे त्यांचा ‘फेक नॅरेटिव्ह’ सर्वांसमोर उघडा पडेल.

भंडारा-गोंदियातील राजकीय समीकरणे भाजपच्या बाजूने झुकवण्यात मोलाची भूमिका निभावणारे डॉ. परिणय फुके यांचे हे विधान म्हणजे केवळ राजकीय टोला नाही. काँग्रेसच्या प्रचारयंत्रणेला थेट दिलेला ‘रिअॅलिटी चेक’ आहे. आता या पत्रामुळे काँग्रेसला अडचणींचा सामना करावा लागणार की, ते पुरावे सादर करून आपली बाजू मजबूत करतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राजकारणात आरोप-प्रत्यारोप हे नवे नाहीत, पण या वेळी खेळ कागदावर आणि कायद्यात चाललाय. आयोगाचा इशारा, फुके यांचा अटॅक आणि राहुल गांधींची अडचण, या त्रिकोणी समीकरणाने महाराष्ट्राचे राजकारण आणखी तापणार हे नक्की.

Parinay Fuke : कमळ फुलवण्यासाठी डॉ. फुके मैदानात

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित यांनी अनेक वर्ष सकाळ माध्यम समूहासोबत रिपोर्टर म्हणून काम केलं. साम टिव्हीचे ते रिपोर्टर होते. याशिवाय सरकारनामा या सकाळ समूहाच्या राजकीय वेब पोर्टलचे प्रतिनिधी देखील होते.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!