नागपूर जिल्हा न्यायालयात खून प्रकरणी शिक्षा भोगत असलेला कैदी गांजा तस्करी करण्याच्या प्रयत्नात पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
महाराष्ट्राची उपराजधानी, विदर्भाची राजधानी आणि स्मार्ट सिटी म्हणून ओळखला जाणारे नागपूर शहर सध्या एका धक्कादायक घटनेमुळे गदारोळात आहे. शहरातील जिल्हा न्यायालयाच्या आवारात एका कैद्याने गांजा तस्करी करताना पोलिसांच्या जाळ्यात सापडल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना फक्त नागपूर शहरातच नव्हे तर संपूर्ण पोलीस प्रशासनात खळबळ उडवणारी ठरली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे गृहनगर असलेल्या या शहरात गेल्या काही महिन्यांपासून अमली पदार्थांची तस्करी हळूहळू वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.
नागपूर पोलिसांनी सुरू केलेल्या ऑपरेशन थंडर सारख्या मोहीमेनंतरही नागपूर शहरात तस्करी थांबत नसल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. गुरुवारी (14 ऑगस्ट रोजी) नागपूर जिल्हा न्यायालयाच्या आवारात एका खून प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याला गांजा तस्करी करताना पकडले गेले. पोलिसांच्या माहितीनुसार, कैद्याने गांजा आपल्या गुप्तांगात लपवून तुरुंगात पोहोचवण्याचा कट रचला होता. हेड कॉन्स्टेबल सुनील तिवारी यांना ही माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक मनीष बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली त्वरित कारवाई करण्यात आली.
Parinay Fuke : स्वातंत्र्य दिनी नशेच्या सावटावर आमदारांचा प्रहार
शहराच्या सुरक्षेला धोका
तपासादरम्यान, रवी विलास धांडे, अनुज राजू नागपुरे आणि एका अल्पवयीन मुलासह तिघांना न्यायालयात पकडण्यात आले. विशेषतः रवी धांडे हा मकोका अंतर्गत आरोपी असून, फक्त 15 दिवसांपूर्वीच तुरुंगातून सुटला होता. धांडे कडून गांजा जप्त करण्यात आला आणि तिघांवर गुन्हा दाखल केला गेला. हेड कॉन्स्टेबल तिवारी, शोएब शेख, प्रीतम ठाकूर आणि चंद्रशेखर फिस्के यांनी या कारवाईत विशेष भूमिका बजावली. पोलिसांच्या सतर्कतेमुळे एका मोठ्या गुन्हेगारी कटाचे अवकाश उधळले गेले, मात्र नागपूर शहरातच जर मोठ्या प्रमाणावर तस्करी होत असेल, तर हे एक गंभीर प्रश्नचिन्ह ठरते.
प्रशासनावर प्रश्न उपस्थित होतो की, जेव्हा शहराचे नेते आणि गृहनगर इतक्या घटनांच्या प्रकाशात येतो, तेव्हा काय व्यवस्थापन अयशस्वी ठरले आहे? महाराष्ट्रात अमली पदार्थांच्या तस्करीचे जाळे दिवसेंदिवस पसरत आहेत. विविध जिल्ह्यांमध्ये पोलिसांनी अनेक मोहीम राबवल्या आहेत. मात्र, अद्यापही तस्करीचा जाळा पूर्णतः नष्ट झाल्याचे दिसत नाही. या पार्श्वभूमीवर नागपूर सारख्या महत्त्वाच्या शहरात घडणाऱ्या घटनांवर प्रशासनाची भूमिका, पोलिसांचे प्रयत्न आणि नेत्यांचे गृहनगर या घटकांवर चर्चेचा पारा वाढण्याची शक्यता आहे. नागपूर शहरातील ही घटना फक्त गुन्हेगारीच नव्हे, तर प्रशासनिक अपयशाचे एक धक्कादायक उदाहरण ठरते. शहरातील सुरक्षा यंत्रणेला धक्का देणारी ही घटना, शहराच्या नागरिकांसाठी धोकादायक असल्याचे स्पष्ट होते.
Independence Day : मोदींच्या इतिहास विकृती भाषणावर सपकाळांची टोलेबाजी
