महाराष्ट्र

Parinay Fuke : जनतेच्या सेवेसाठी आमदार झाले सक्रिय

Bhandara : जनसंपर्क कार्यालयातून विकासाची गती वाढवणार

Post View : 37

Author

भंडारा-गोंदियातील भाजपचे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके सक्रिय राहून जनतेशी थेट संवाद साधत विकासकामांचा आढावा घेत आहेत.

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. प्रत्येक राजकीय पक्ष निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरले आहेत. कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. निवडणूक आयोगही आपल्या तयारीला गती देत आहे. अशा उत्साही वातावरणात भंडारा-गोंदिया येथील वैनगंगेच्या तीरावर विकासाचा झेंडा फडकवणारे भाजपचे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके पुन्हा एकदा सक्रिय भूमिकेत दिसत आहेत. जनतेच्या हितासाठी त्यांचा अथक प्रयत्न आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे ते नेहमीच चर्चेत असतात. भंडारा जिल्ह्यातील जनतेच्या मनात त्यांनी एक विश्वासार्ह आणि कर्तव्यदक्ष नेत्याची प्रतिमा निर्माण केली आहे.

डॉ. फुके यांनी नुकतीच भंडारा येथील भारतीय जनता पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाला भेट देऊन पक्षाच्या कार्यकर्त्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधला. या भेटीत त्यांनी पक्षाच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध विकासकामांचा बारकाईने आढावा घेतला. येणाऱ्या काळात विकासाला अधिक गती कशी मिळेल, याबाबतही सविस्तर चर्चा झाली. कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देताना त्यांनी पक्षाच्या ध्येयधोरणांवर प्रकाश टाकला आणि भविष्यातील नियोजनाला दिशा दिली. या संवादातून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. डॉ. फुके यांच्या या भेटी दरम्यान अनेक नागरिकांनीही त्यांची भेट घेतली.

Corporation Eelection : बाप्पा आले, प्रचारात जान आली

नेतृत्वाची सकारात्मक छाया

गावकऱ्यांनी आपल्या दैनंदिन जीवनातील अडचणी, प्रलंबित प्रश्न आणि शासकीय कामकाजातील तक्रारी त्यांच्यासमोर मांडल्या. शेतकऱ्यांच्या समस्यांपासून ते सामान्य नागरिकांच्या अडचणींपर्यंत प्रत्येक मुद्द्याकडे त्यांनी लक्ष दिले. नागरिकांनी दिलेली निवेदने स्वीकारून त्यांनी संबंधित विभागांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. जनतेच्या समस्यांचे निराकरण हाच माझा प्राधान्याचा विषय आहे, असे सांगताना डॉ. फुके यांनी आपली कटिबद्धता पुन्हा एकदा दाखवून दिली. भाजपाचे जनसंपर्क कार्यालय हे केवळ पक्षाचे कार्यालय नसून, कार्यकर्ते आणि जनता यांच्यातील एक मजबूत पूल आहे, असे डॉ. फुके यांचे ठाम मत आहे. हे कार्यालय नेहमीच सर्वसामान्यांसाठी खुले आहे.

पक्षाच्या माध्यमातून होणाऱ्या विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे, त्यांच्या अडचणी सोडवणे आणि विकासाचा वेग वाढवणे हाच आमचा उद्देश आहे, असे त्यांनी ठासून सांगितले. या कार्यालयाच्या माध्यमातून भंडारा-गोंदियातील विकासाला नवी दिशा मिळत आहे.डॉ. परिणय फुके यांचे नेतृत्व हे सकारात्मकतेचा आणि कृतीशीलतेचे एक उत्तम उदाहरण आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी असोत, सामान्य नागरिकांचे प्रश्न असोत किंवा कार्यकर्त्यांच्या समस्या असोत, प्रत्येक गोष्टीत ते स्वत:ला झोकून देतात. त्यांच्या या कार्यशैलीमुळे भंडारा-गोंदियातील जनता त्यांच्याकडे एक विश्वासार्ह आणि सकारात्मक नेता म्हणून पाहते. त्यांनी आजपर्यंत केलेल्या कामांमुळे अनेक विकास प्रकल्पांना गती मिळाली आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागले आहेत. जनतेचा त्यांच्यावरील विश्वास दृढ झाला आहे.

Archit Chandak : गोवंश तस्करांसाठी थेट कोठडी

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित यांनी अनेक वर्ष सकाळ माध्यम समूहासोबत रिपोर्टर म्हणून काम केलं. साम टिव्हीचे ते रिपोर्टर होते. याशिवाय सरकारनामा या सकाळ समूहाच्या राजकीय वेब पोर्टलचे प्रतिनिधी देखील होते.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!