महाराष्ट्र

Parinay Fuke : अंबाझरीचे दूषण दादा करणार दूर

Ambazari Lake : नागपुरातील ठेवा वाचविण्यासाठी सरसावले

Post View : 125479

Author

नागपूरचे वैभव म्हणून ओळख असलेल्या अंबाझरी तलावाच्या संवर्धनासाठी भाजपा नेते आ. डॉक्टर परिणय फुके पुढे सरसावले आहेत.

Assembly Session : नागपूरमध्ये प्रचंड जैवविविधता आणि नैसर्गिक सौंदर्य असलेल्या अंबाझरी तलावाला आपले गत वैभव पुन्हा मिळवून देण्यासाठी भाजपा नेते आमदार डॉ. परिणय फुके पुढे सरसावले आहेत. आमदार फुके यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये अंबाझरी तलावाच्या दूषणाकडे सरकारचे लक्ष वेधले. नागपूरकरांचे मनमोहन घेणाऱ्या अंबाझरी तलावाला जलपर्णी अर्थात एकॉर्निया नावाच्या वनस्पतीने वेढा घातला. त्यामुळे बघता बघता संथपणे स्थिरावलेला अंबाझरी तलाव पूर्णपणे दूषित झाला. ही बाब लक्षात येताच, भाजप नेते डॉ. परिणय फुके हे अंबाझरीच्या संवर्धनासाठी पुढे आलेत.

सुमारे वर्षभरापासून आमदार डॉ. फुके यांनी अंबाझरीच्या मुद्द्यावर लक्ष घालण्यास सुरुवात केली. स्वच्छ अंबाझरी, सुंदर अंबाझरीचा ध्यास घेत आमदार डॉ. परिणय फुके यांनी शासन दरबारी पाठपुरावा सुरू केला. अंबाझरी स्वच्छ होईपर्यंत आपले भगीरथ प्रयत्न सुरूच ठेवण्याचा निर्धार करीत आमदार डॉ. फुके यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात दूषणमुक्त अंबाझरीचा आवाज बुलंद केला. गेल्या वर्षभरापासून सरकारकडे केलेल्या पाठपुराव्याचा लेखाजोखा त्यांनी विधिमंडळाच्या कामकाजात मांडला. पावसाळी अधिवेशनात अंबाझरी संवर्धनासाठी आणखी आक्रमक भूमिका घेण्याचा निर्धार आमदार फुके यांनी व्यक्त केला.

Parinay Fuke : जलपर्यटनात भ्रष्टाचार भारी, आता करावी लागणार जेलवारी

मनपाही सरसावली

आमदार डॉ. परिणय फुके यांनी सुरू केलेल्या या प्रयत्नांना नागपूर महापालिकेने देखील सकारात्मक प्रतिसाद दिला. या विषयाबाबत मागील वर्षभरापासून सातत्याने प्रयत्न करीत असलेल्या आमदार डॉ. परिणय फुके यांचे प्रयत्न पुढे नेत, सध्या नागपूर महानगरपालिकेमार्फत तलावातील जलपर्णी हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. जेसीबी, विशेष यंत्रसामग्री तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तलावाची स्वच्छता करण्यात येत आहे. या कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आमदार डॉ. परिणय फुके यांनी नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांच्यासमवेत अंबाझरी तलाव व उद्यान परिसराचा दौरा केला.

अंबाझरी तलावाच्या दौऱ्यावेळी दोघांनी सुरू असलेल्या कामांचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. यावेळी आमदार डॉ. परिणय फुके म्हणाले की, “अंबाझरी तलाव हा नागपूरकरांच्या भावविश्वाशी जोडलेला आहे. अंबाझरी शहराचा पर्यावरणीय वारसा आहे. या तलावाचे संरक्षण आणि संवर्धन करणे ही जनप्रतिनिधी म्हणून आपली जबाबदारी आहे. मागील काही वर्षांत तलावामध्ये वाढलेल्या प्रदूषणामुळे जलपर्णीची समस्या गंभीर बनली होती. या समस्येच्या निराकरणासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आहे. आता प्रत्यक्षात कामे सुरू झालेली पाहून समाधान वाटत आहे.”

कार्यपद्धतीचे कौतुक

आमदार डॉ. परिणय फुके यांनी नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांच्या कार्यपद्धतीचे विशेष कौतुक केले. डॉ. फुके म्हणाले “डॉ. विपीन इटनकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील विविध विकासकामांना तसेच पर्यावरण संवर्धनाशी संबंधित उपक्रमांना अधिक गती मिळाली आहे. प्रशासनामध्ये परिणामकारक कार्यसंस्कृती निर्माण करून त्यांनी अनेक प्रलंबित कामे मार्गी लावण्याचे काम केले आहे. अंबाझरी तलावातील जलपर्णी निर्मूलनाचे कामही त्यांच्या पुढाकारामुळे वेगाने सुरू आहे. नियोजनबद्ध पद्धतीने दर्जेदार काम होत आहे. नागपूरकरांच्या अपेक्षांनुसार हे काम पूर्ण होईल, असा विश्वास आहे.”

Parinay Fuke : दादांची काँग्रेसला ‘दफा तीन सौ दो’

आयुक्तांकडून आढावा

मनपा आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांनी अंबाझरी परिसरात सुरू असलेल्या कामांची माहिती दिली. तलावातील जलपर्णी निर्मूलन, पाण्याची गुणवत्ता सुधारणा आणि तलावाचे नैसर्गिक स्वरूप जतन करण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत असल्याचे सांगितले. अंबाझरी तलावाचे पुनरुज्जीवन, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने आमदार डॉ. परिणय फुके यांनी सुरू केलेल्या मोहिमेमुळे भविष्यात नागपूरकरांना स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त अंबाझरी तलाव उपलब्ध होणार असून शहराच्या पर्यावरणीय समतोलालाही मोठा हातभार लागणार आहे.

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित यांनी अनेक वर्ष सकाळ माध्यम समूहासोबत रिपोर्टर म्हणून काम केलं. साम टिव्हीचे ते रिपोर्टर होते. याशिवाय सरकारनामा या सकाळ समूहाच्या राजकीय वेब पोर्टलचे प्रतिनिधी देखील होते.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!