महाराष्ट्र

शब्दाची Commitment महत्वाची मानणारा सामाजिक डॉक्टर

आमदार Prainay Fuke करीत आहेत विकासासाठी दिवसरात्र एक

Share:

Author

Views: 157625

निवडणूक जिंकल्यानंतर लोकप्रतिनिधीचा चेहरा पाच वर्षांपर्यंत दिसत नाही. सर्वसामान्यांना नेत्यांबाबत असा अनुभव येतो. परंतु भंडारा-गोंदियातील भाजपचे हेवीवेट नेते आमदार डॉ. परिणय फुके यांच्याबाबत समीकरण अगदी उलट आहे.

मतदारसंघातून गायब राहणारे अनेक नेते नागरिकांच्या रोषाला निवडणुकीच्या वेळी सामोरे जातात. मतदारसंघाचा नेत्यानं किती विकास केला याची ‘लिटमस टेस्ट’ निवडणुकीच्या काळात होत असते. परंतु भाजपचे माजी राज्यमंत्री तथा आमदार डॉ. परिणय फुके यांच्याबाबतीत स्थिती अगदी उलट आहे. पूर्णवेळ मतदारसंघात उपस्थित राहणारे लोकप्रतिधी म्हणून त्यांची भंडारा-गोंदिया या दोन्ही जिल्ह्यात ख्याती आहे. आपण दिलेल्या शब्दाची ‘कमिटमेंट’ पूर्ण करणारे लोकप्रतिनिधी म्हणून परिणय रमा रमेश फुके दोन्ही जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत.

भाजप कार्यकर्ता ते विधान परिषद आमदार व्हाया राज्यमंत्री असा त्यांचा प्रवास राहिला आहे. भाजपमध्ये ज्यांनी नागपूरच्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत डंका गाजवला असे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू व नीकटवर्ती म्हणजेच परिणय फुके. त्यांच्या नावापुढं डॉक्टर ही पदवी आहे. डॉक्टर व्यक्तीच्या आरोग्य विषय कोणत्याही समस्येचा इलाज करतात. परंतु डॉक्टर म्हणून परिणय फुके हे सामाजिक समस्यांवर रामबाण औषध शोधतात व त्याचा वेळीच उपचार करतात. पद असो किंवा नसो अव्याहत जनसेवा करीत राहणारा नेता म्हणून परिणय फुके यांच्याकडं पाहिलं जातं.

Mahayuti मधील संवाद सेतू

रावणापर्यंत पोहोचण्यासाठी हनुमंतानं आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीनं रामसेतूची उभारणी केली. आजही हा सेतू एकीच्या बळाची साक्ष देतो. भंडारा-गोंदियातील महायुतीसाठी परिणय फुके हे असाच एक मजबूत सेतू आहेत. लोकसभा व त्यानंतर विधानसभा निवडणुकीत त्यांनी महायुतीच्या सर्व घटकपक्षांसोबत खांद्याला खांदा लावत काम केलं. भंडारा-गोंदिया या दोन्ही जिल्ह्यात भाजपची पाळमुळं आणखी खोल केली. कार्यकर्त्यांची सक्षम फळी तयार केली. सामाजिक काम करताना फुके यांच्या अंगी हनुमंतासारखंच बळ आहे. भंडारा-गोंदियाचे पाकलमंत्री असताना त्यांनी अनेक प्रकल्प या दोन्ही जिल्ह्यांसाठी आणले. हनुमानानं द्रोणागिरीचा भार उचलत नवसंजीवनी आणली होती. आव्हानांचा असाच द्रोणागिरी पेलत फुके यांनी भंडारा-गोंदिया या दोन्ही जिल्ह्यांसाठी विकासाची नवसंजीवनी आणली.

भंडाऱ्याचा पालकमंत्री ठरताना Parinay Fuke निभावणार भूमिका

कार्यकर्त्यानं दिवसरात्र एक करून केलेल्या प्रत्येक कामाची पावती भारतीय जनता पार्टी देते. शिस्त, संयम, राष्ट्रप्रेम अन् एकनिष्ठता हाच भाजपचा पाया आहे. या पंचसूत्रीवर डॉ. परिणय फुके यांनी वाटचाल सुरू ठेवली. त्यामुळंच भाजपनं त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेपासून राज्याच्या विधिमंडळापर्यंत सदस्यत्वाची संधी दिली. धान पिकाच्या नोंदणीची मुदत त्यांच्याच पाठपुराव्यामुळं वाढली. त्यामुळं भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील लाखो धान उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळाला. काही शासकीय अधिकारी, कर्मचारी सोशल मीडियावर रीलबाजी करण्याच्या आहारी गेले आहेत. अशांवर उपचार करण्याची मागणी त्यांनी महायुती सरकारकडं केली. बोगस डॉक्टर आणि बोगस औषध कंपन्यांना कारवाईचं इंजेक्शन टोचलं गेलं ते देखील परिणय फुके यांच्या मुळंच

धारगाव उपसा सिचंन योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचं कामही मार्गी लावणारे डॉ. परिणय फुके हेच. कामचा प्रचंड आवाका आणि जनतेने दिलेल्या संधीप्रती असलेली जबाबदारीची जाणी फुके यांच्या वागण्याबोलण्यातून बघायला मिळतं. परिपक्व राजकारणी म्हणून ते परिचित आहेत. ओबीसींच्या समस्येवर यशस्वी तोडगा त्यांच्याच पुढाकारानं निघाला. गोंड-गोंवारी समाजालाही त्यांच्याच मुळं न्याय मिळाला. ओबीसींच्या वसतिगृहाचा मुद्दाही मार्गी लागला. नॉन क्रिमिलेअरच्या विषयासाठीही त्यांनी यशस्वी पाठपुरावा केला. त्यामुळं भंडारा-गोंदियातील ‘यंग’ असो की ‘ओल्ड’ सगळेच मानतात कामाच्या बाबत परिणय फुके आहेत बावन्नकशी ‘गोल्ड’.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!