महाराष्ट्र

Parinay Fuke : कमळ फुलवण्यासाठी डॉ. फुके मैदानात

Bhandara Politics : कार्यालय उद्घाटनातून नगरपरिषद जिंकण्याचा संकल्प

Post View : 36

Author

माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी भंडाऱ्यात भाजपच्या नव्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले.

भंडारा जिल्हा नेहमीच भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. या गडाच्या मजबूत किल्लेबंदीसाठी सतत काम करणारे आणि पक्षाचा कमळ सातत्याने फुलवत ठेवणारे नाव म्हणजे भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके. सहकार क्षेत्रापासून बँकेच्या निवडणुकीपर्यंत, दूध संघापासून कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंत प्रत्येक ठिकाणी डॉ. परिणय फुके यांचा प्रभाव आणि मेहनत दिसून येते. नुकतंच 10 ऑगस्ट 2025 रोजी भंडाऱ्यात भाजपच्या नवीन जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन पार पडले. हे कार्यालय केवळ एक इमारत नसून कार्यकर्ते आणि जनतेच्या संवादासाठी, समस्या मांडण्यासाठी आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी एक नवे व्यासपीठ ठरणार आहे.

उद्घाटन सोहळ्यात बोलताना डॉ. परिणय फुके यांनी पक्षाच्या आगामी रणनीतीची झलक दाखवली आणि थेट नगरपरिषदेच्या निवडणुकीचा इशारा दिला. या नवीन जनसंपर्क कार्यालयात महिन्यातून किमान दोन वेळा जनता दरबार घेण्याची घोषणा डॉ. परिणय फुके यांनी केली आहे. भंडाऱ्यात आलो की 100 टक्के या कार्यालयाला भेट देणार, अर्धा-एक तास बसून जनहिताच्या मुद्द्यावर चर्चा करणार, असे ते म्हणाले. डिजिटल युगाशी जुळवून घेत, त्यांनी क्यूआर कोड प्रणाली देखील सुरू केली आहे. याच्या माध्यमातून नागरिक थेट भाजपच्या जनसंपर्क कार्यालयाशी जोडले जाऊन आपली पत्रे, तक्रारी व मागण्या नोंदवू शकतील. यामुळे लोकांच्या तक्रारी ट्रॅक होऊन त्यांचे योग्य निराकरण होईल, असा डॉ. परिणय फुके यांचा विश्वास आहे.

Maharashtra : लोकसभा-विधानसभेचा वाद स्थानिक पातळीवरही रंगणार?

जबाबदारीची जाणीव आवश्यक

डॉ. फुके यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट संदेश दिला की, पक्षाशी निष्ठा आणि सक्रियता दाखवणाऱ्यांनाच आगामी निवडणुकींमध्ये महत्त्वाची पदे मिळतील. त्यांनी तयार केलेल्या खास व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये अजूनही अनेक कार्यकर्त्यांची नावे नाहीत. ज्यांची नावे या ग्रुपमध्ये नाहीत, त्यांना यावेळी नगरसेवक किंवा नगराध्यक्षपद मिळण्याची शक्यता आहे, असा थेट इशारा त्यांनी दिला. यातून डॉ. फुके यांची रणनीती स्पष्ट होते. पक्षाशी प्रामाणिक, मेहनती आणि लोकांशी सतत संपर्कात राहणाऱ्या कार्यकर्त्यांनाच पुढे नेणे. जे कार्यकर्ते खरोखरच ॲक्टिव्ह आहेत त्यांनाच न्याय मिळणार, असे ते म्हणाले.

डॉ. परिणय फुके यांनी सहकार क्षेत्रात मोठे यश मिळवले आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती, बँक, दूध संघ अशा सर्व ठिकाणी भाजपचे प्रतिनिधी आहेत. आता आपल्याकडे बसायला आणि काम करायला आपले स्वतःचे केंद्र उपलब्ध आहे. येथूनच नगरपरिषदेची निवडणूक लढवायची, असे डॉ. परिणय फुके यांनी स्पष्ट केले. भंडाऱ्यातील हे नवे कार्यालय केवळ पक्षासाठीच नव्हे तर जिल्ह्यातील राजकीय समीकरणांसाठी निर्णायक ठरणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून डॉ. फुके यांनी दिलेला हा इशारा कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी तर आहेच, पण त्याचबरोबर जबाबदारीची जाणीव करून देणारा देखील आहे.

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांच्या शरद पवारांना कृतीचा मंत्र

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित यांनी अनेक वर्ष सकाळ माध्यम समूहासोबत रिपोर्टर म्हणून काम केलं. साम टिव्हीचे ते रिपोर्टर होते. याशिवाय सरकारनामा या सकाळ समूहाच्या राजकीय वेब पोर्टलचे प्रतिनिधी देखील होते.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!