देशाच्या स्वातंत्र्याची खरी जाणीव प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात रुजवण्यासाठी भाजपचे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी एक महत्त्वपूर्ण आणि सकारात्मक पाऊल उचलले आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभरात उत्साहात साजरा होत असताना, 14 ऑगस्ट हा दिवस मात्र इतिहासाच्या पानांवर एक कटू सत्य घेऊन उभा आहे. भारताच्या फाळणीच्या त्या भयंकर आठवणी, ज्या लाखो लोकांच्या आयुष्याला कायमस्वरूपी बदलून टाकणाऱ्या ठरल्या, त्या आजही मनाला चटके देतात. या फाळणीच्या वेदनेने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले, घरदार सोडावे लागले आणि असंख्य जीव गमावले गेले. पण या दुःखद स्मृतींना उजाळा देताना, भाजपचे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी एक नवा विचार मांडला आहे. हा दिवस केवळ दुःखाचा नाही, तर देशाच्या एकतेचा, सौहार्दाचा आणि स्वातंत्र्याच्या अमूल्यतेचा संदेश देणारा असावा. भारताच्या फाळणीच्या वेदनांचा इतिहास अविस्मरणीय आणि हृदयद्रावक आहे.
14 ऑगस्ट 1947 रोजी पाकिस्तान स्वातंत्र्य झाला आणि एक दिवसानंतर, 15 ऑगस्ट रोजी भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाले. मात्र, स्वातंत्र्याच्या या ऐतिहासिक क्षणामध्ये, एक भयंकर विभाजनाची वेदना दडलेली आहे. ही विभीषिका एक शोकात्मक पण अत्यंत आवश्यक शिक्षण प्रक्रिया बनली आहे. ज्याचा प्रभाव अनेक पिढ्यांवर पडला आहे. काही काळापूर्वी, स्वातंत्र्याचे लढे आणि त्यातील संघर्ष केवळ काही मुख्य नेत्यांपुरतेच मर्यादित होते. हे लढे पिढ्यानपिढ्या मोजक्या लोकांवर केंद्रित राहिले. परंतु, डॉ. परिणय फुके यांच्या मते, स्वातंत्र्याच्या या अमूल्य धड्यांचा विस्तार विद्यार्थ्यांपर्यंत होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांनी सांगितले की, स्वातंत्र्य किती अमूल्य आहे, हे लहान मुलांच्या मनावर ठरवून ठेवणे आवश्यक आहे. त्यांच्या या विचारांनुसार, शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य, एकता आणि सर्वसमावेशकतेचे महत्त्व शिकवले पाहिजे. हे विचार केवळ ऐतिहासिक नसून, त्यातून भविष्यातील प्रत्येक नागरिकाला आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा अस्सल आणि दृष्टीकोन असलेला जाणीव होईल.
Parinay Fuke : दादांच्या कुशल चालीने पूर्व विदर्भात महायुतीचे वर्चस्व अबाधित
इतिहासाच्या धड्यांची ओळख
डॉ. परिणय फुके यांचा हा मागणीचा स्वरूप आणि विचार अत्यंत प्रेरणादायक आहे. कारण त्यांचा विश्वास आहे की स्वातंत्र्याचे धडे सर्व मुलांपर्यंत पोहोचले पाहिजे. त्यांच्यातून भविष्यात एक मजबूत आणि एकसंध भारत घडावा. शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांच्या मनावर स्वातंत्र्याची अमूल्यता कोरली गेली पाहिजे, असा त्यांचा आग्रह आहे. डॉ. फुके यांचा हा विचार केवळ शब्दांपुरता मर्यादित राहिलेला नाही. त्यांनी या दृष्टिकोनाला प्रत्यक्ष कृतीची जोड दिली. त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली की, राज्यातील सर्व शाळांमध्ये 14 ऑगस्ट हा दिवस ‘विभाजन विभीषिका स्मृती दिन’ म्हणून साजरा व्हावा. विशेष म्हणजे, या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
आता महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये 14 ऑगस्ट हा दिवस साजरा केला जाणार आहे. डॉ. फुके यांच्या या पुढाकाराने इतिहासाच्या पानांना जिवंत करत, नव्या पिढीला स्वातंत्र्याच्या खऱ्या अर्थाची ओळख करून देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांच्या मते, फाळणीच्या त्या वेदनादायी आठवणींमधून आपण धडा घ्यायला हवा. त्या काळात लाखो लोकांनी आपली माती, घर आणि प्रियजन गमावले. भीषण हिंसा, रक्तपात आणि विस्थापनाच्या त्या जखमा आजही इतिहासात जिवंत आहेत. पण या स्मृतींना केवळ दुःखाचा भाग न मानता, त्यातून एकतेचा आणि सशक्त भारताच्या निर्मितीचा संदेश घ्यायला हवा, असं डॉ. फुके यांचे म्हणणे आहे. हा निर्णय घेण्यासाठी डॉ. फुके यांनी केलेला पाठपुरावा आणि त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न कौतुकास्पद आहे.
डॉ. फुके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र सरकारचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. हा केवळ एक दिवस साजरा करण्याचा निर्णय नाही, तर पुढच्या पिढीला आपल्या इतिहासाशी जोडण्याचा आणि त्यांच्यामध्ये एकतेची भावना रुजवण्याचा एक सकारात्मक प्रयत्न आहे, असं ते म्हणाले. त्यांच्या या प्रयत्नांमुळे आता शाळांमध्ये विद्यार्थ्यांना फाळणीच्या त्या कठीण काळाची माहिती मिळेल. त्यातून ते स्वातंत्र्याची खरी किंमत समजून घेतील.
Prashant Padole : पूरग्रस्त नागरिकांचे तारणहार बनले काँग्रेस खासदार
